मुंबई : उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. याचाच परिणाम म्हणून सोन्याचे दर वधारले आहेत.

मागच्या आठवड्यात 29 हजार 100 रुपयांवर असलेले सोनं 30 हजार 100 वर पोहोचलं आहे. त्यात जीएसटीची भर म्हणून हाच दर 31 हजारांवर पोहोचला आहे. आजचाही दर 30 हजाराच्या घरात पोहोचला आहे.

दरम्यान, सोन्याच्या चढ्या दराविषयी बोलताना नाशिकचे सराफ व्यायसायिक अनिल दंडे म्हणाले की, "सोन्याच्या दरवाढीमागे उत्तर कोरियाची बॉम्ब चाचणी हे कारण आहेच. परंतु आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेला करार. या करारानुसार, भारताने कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्यूटी लागत नाही. मागील दोन महिन्यात दहा टन नाणी आयात झाली आहेत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नव्हता. त्यामुळे सोन्याचा दर कमी होता.

सराकरने हे सोनं बाजारात आणून ते वितळवलं. परंतु सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही. तसंच दीड महिन्यानंतर ही आयात बंद झाल्याने सोन्याचे दर वधारले आहेत."

पुढील काही दिवस सोन्याचे दर चढेच राहण्याची शक्यता अनिल दंडे यांनी वर्तवली आहे.

संबंधित बातम्या

उत्तर कोरियाकडून हायड्रोजन बॉम्बची चाचणी, जगात चिंतेचं वातावरण

उत्तर कोरियाने जपानवरुन मिसाईल सोडलं, दोन्ही देशात तणाव

उत्तर कोरियासंदर्भातील ट्विटवरुन चिनी मीडियाची ट्रम्प प्रशासनावर आगपाखड

उत्तर कोरिया: बैठकीत लागली डुलकी, संरक्षण मंत्र्याना धाडलं यमसदनी!