बलुचिस्तान : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये आज भारताचा तिरंगा फडकला. इतकंच नाही तर स्वातंत्र्य समर्थकांनी बलुचिस्तानचे शहीद म्हणून ओळखले जाणारे नेते अकबर बुगती यांच्या फोटोसह भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही झळकावले. यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. तसंच पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला.
बलुचिस्तानमध्ये मागील चार दिवसांपासून पाकिस्तानविरोधात आंदोलन सुरु आहे. सुई, डेरा बुगती, जाफराबाद, नसीराबादसह बलुचिस्तानच्या इतर भागात पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आंदोलन सुरु आहे.
लाल किल्ल्यावरुन मोदींचं भाषण, बलुचिस्तानात वाहवा!
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला होता. बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं म्हटलं होतं. तसंच बलुचिस्तान, गिलगिलत-बाल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या नागरिकांना आपले आभार मानल्याचंही ते म्हणाले होते.
खुद्द पाकिस्तानातच पाकविरोधी घोषणाबाजी!
"पाकिस्तान इथे नरसंहार करतो. पाकिस्तानी सैन्य प्रत्येक दिवशी डझनभर तरुणांची हत्या करतं. हजारो नागरिक बेपत्ता आहे. पाकिस्तानने बलुचांना गुलाम बनवलं आहे," असा दावा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचे समर्थक नेते ब्रह्मदाग बुगती यांनी केला आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या विधानामुळे आणि भारताच्या नव्या भूमिकेमुळे आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फुटेल, अशी आशा निर्माण झाल्याचंही बुगती म्हणाले.
पाकिस्तानात आणि नरकात जाणं सारखंच : पर्रिकर