हे विमान इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथून केनियाची राजधानी नैरोबी येथे जात होते. या विमानात 8 क्रू मेम्बर्स आणि 149 प्रवासी होते. त्यामध्ये चार प्रवासी भारतीय होते. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.
इथोपियन एअरलाइन्सने याबाबत सांगितले की "8.30 वाजता उड्डाण केलेल्या या विमानाचा 8.45 च्या दरम्यान कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान अदिस अबाबाजवळ कोसळले असून आम्ही बचाव कार्य सुरु केले आहे. तसेच आम्ही प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी माहिती केंद्र सुरू केले असून आपतकालीन फोन क्रमांकदेखील जाहीर केले आहेत."
दरम्यान इथोपियन पंतप्रधान अबी अहमद यांनी ट्वीट करुन दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "आज सकाळी नैरोबीला जाणाऱ्या बोईंग 737 या विमानाने प्रवास करणाऱ्या ज्या प्रवाशांना आपण गमावले आहे, त्यांच्या परिवारांप्रती मी शोक व्यक्त करतो."