इस्लामाबाद : इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे इम्रान खान हे पंतप्रधान झाल्यास पंतप्रधानपदी वर्णी लागलेले इम्रान खान प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातले पाचवे क्रिकेटर ठरणार आहेत.


पाकिस्तानातल्या निवडणुकांमध्ये माजी कसोटीवीर इम्रान खान यांच्या पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि तहरिक ए इन्साफ पक्षाचे प्रमुख नेते इम्रान खान यांचा पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याचा मार्ग खुला होणार आहे.

1925 साली न्यूझीलंडचे फ्रान्सिस बेल पंतप्रधान बनलेले पहिले क्रिकेटपटू ठरले होते. 1970 साली इंग्लंडचे अॅलेक डग्लस-होम, 1994 साली फिजीचे कामिसेसे मारा आणि 1997 साली पाकिस्तानचे नवाज शरीफ यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. नवाज शरीफ यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या रेल्वे संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे.