Mass Shooting in Thailand : थायलंडच्या ईशान्येकडील प्रांतात बालसंगोपन केंद्रात माजी पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 22 चिमुरड्यांसह 34 जणांचा करुण अंत झाला. पोलिसांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने रक्तपात केल्यानंतर स्वत:वरही गोळी झाडल्याने त्याचाही मृत्यू झाला. पोलिस उपप्रवक्ते अर्कोन क्रेटोंग यांनी रॉयटर्सला माहिती देताना सांगितले की, "या घटनेत तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॉन्ग बुआ-लुम्फू येथील बालसंगोपन केंद्रात एका बंदुकधारीनं घुसून गोळीबार करण्यास सुरुवात केली. गोळीबार करणारा घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती मिळत आहे.

  






पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बंदूकधारी माजी पोलीस अधिकारी होता आणि त्याचा शोध सुरू होता. थायलंडमध्ये बंदुकधाऱ्यांचा दर प्रदेशातील काही इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. परंतु, अधिकृत आकडेवारीमध्ये मोठ्या संख्येने बेकायदेशीर शस्त्रे समाविष्ट नाहीत. ज्यापैकी बऱ्याच वर्षांमध्ये संघर्षग्रस्त शेजाऱ्यांकडून सीमा ओलांडून आणल्या गेल्या आहेत.


थायलंडमध्ये सामूहिक गोळीबार दुर्मिळ आहे. परंतु, 2020 मध्ये, मालमत्तेच्या व्यवहारावर चिडलेल्या एका सैनिकाने चार ठिकाणी केलेल्या हल्ल्यात किमान 29 लोक मारले आणि 57 जखमी झाले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या