VIDEO | जगातील सुप्रसिद्ध नॉट्र डॅम चर्च आगीच्या भक्ष्यस्थानी
आगीचे लोटे आणि धूर मोठ्या प्रमाणात पूर्ण शहरात पसरायला सुरुवात झाली. घटनास्थळी दाखल असलेल्यांना काहीच शब्द सुचले नाहीत. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अथक प्रयत्न केले. सीन या नदीने वेढलेल्या या चर्चच्या आजूबाजूचा परिसर त्वरित मोकळा करण्यात आला, कारण हा भाग पॅरिसचा मध्यवर्ती भाग आहे. या दुर्घटनेत नागरिकांना कोणतीही हानी झाली नाही.
हार्ट ऑफ पॅरिस मानले जाणारे कॅथेड्रल चर्च बाराव्या शतकात बांधण्यात आले होते. जगभरात ओळखले जाणारे नोट्रे-डेम कॅथेड्रल चर्च पॅरिसची आणि फ्रान्स देशाचं प्रतीक मानलं जातं. युनोस्को वर्ल्ड हेरिटेज असलेल्या या वास्तूला वर्षभरात जवळजवळ 1.2 लाख पर्यटक भेट देतात. पॅरिसमधील आयफेल टॉवर प्रमाणेच हे अत्यंत प्रसिद्ध ठिकाण आहे.