Finland PM Sanna Marin Apologises : फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन (Sanna Marin) यांनी त्यांच्या पार्टीमधील व्हायरल फोटोवर माफी मागितली आहे. सना मरिन यांच्या पार्टीतील एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या दोन मैत्रिणी एकमेकींचं चुंबन घेतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोन्ही महिला टॉपलेस आहेत त्यांनी फिनलँड असं लिहिलेला बोर्ट असून त्या किस करताना दिसत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर सना मरिन यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, हा फोटो जुलै महिन्यामध्ये एका संगीत समारंभावेळीच्या वैयक्तिक पार्टीमधील आहे.
सना मरिन यांनी मागितली माफी
सना मरिन यांनी व्हायरल झालेल्या फोटोवर माफी मागितली आहे. सना मरिय यांनी म्हटलं की, 'हा फोटो योग्य नाही. असा फोटो काढला जाणं चुकीचं आहे. मी याबद्द्ल माफी मागते.' पुढे त्यांनी व्हिडीओबाबत बोलताना म्हटलं आहे की, 'मीही एक माणूस आहे. आणि मलाही कधी, कधी व्यस्त वेळेतून आनंद आणि मजा मिळणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे की लोक आम्ही आमच्या फावल्या वेळेत काय करतो यापेक्षा आम्ही काय काम करतो याकडे जास्त लक्ष देतील.'
सना मरिन यांनी अंमली पदार्थांचं सेवन केल्याच्या आरोप
फिनलँडच्या (Finland) पंतप्रधान सना मरिन (Sanna Marin) यांनी गेल्या आठवड्यात अंमली पदार्थ चाचणी (Drugs Test) केली आहे. पुढील आठवड्यात या ड्रग्ज टेस्टचा (Drugs Test) अहवाल येईल. आपल्या मित्रांसोबतच्या एका पार्टीमध्ये बेभान होऊन नाचतानाचा फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला होता. यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर अंमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप केला. फिनलँडमध्ये या व्हिडीओवरुन चांगलाच गदारोळ झालेला पाहायला मिळाला. अनेकांनी सना मरिन यांच्या डान्सवर टीका केली. पंतप्रधान सना मरिन यांनी पार्टीवेळी ड्रग्जचे सेवन केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.
सना मरिन यांचा पार्टीतील व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये सना मरिन या डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मित्रांचा समावेश आहे. त्यामध्ये एक सेलिब्रेटीही दिसतोय. हे सर्वजण गाताना आणि नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन मरिन यांच्या राजकीय विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. मरिन यांनी या पार्टीच्या वेळी ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे. देशामध्ये अनेक मूलभूत प्रश्न असताना पंतप्रधान पार्टीमध्ये आणि ड्रग्जमध्ये व्यस्त असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
विरोधकांचे आरोप सना मरिन यांनी फेटाळले
विरोधकांच्या या टीकेवर उत्तर देताना सना मरिन यांनी आपण ड्रग्जचे सेवन केलं नसल्याचं स्पष्ट केलं. या पार्टीवेळी आपण फक्त दारुचे सेवन केलं होतं आणि बेभान होऊन नाचल्याचं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान सना मरिन यांनी पार्टीवेळी ड्रग्जचे सेवन केल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे.