World's Fattest Woman : जगातील सर्वात लठ्ठ महिलेनं सुमारे 200 किलो वजन कमी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अमेरिकेच्या (USA) मिसिसिपी (Mississippi) येथील क्रिस्टीना फिलिप्स (Christina Phillips) या लठ्ठ महिलेने तिच्या वजनाच्या दोन तृतियांश वजन कमी केलं आहे. क्रिस्टीना फिलिप्सचं वजन एकेकाळी 700lbs (317.515 किलो) इतकं झालं होतं. लठ्ठपणामुळे तिला दोन वर्ष घराबाहेरही पडता आलं नव्हतं. 2012 मध्ये क्रिस्चीना फक्त 20 वर्षांची होती, तेव्हा तिचं वजन 600 पाऊंड (272 किलो) च्या पुढे गेलं होतं. यावेळी क्रिस्टीना फिलिप्स तिच्या लठ्ठपणामुळे 'My 600-lb Life' या टीव्ही सीरीजमध्येही झळकली होती.
क्रिस्टीना फिलिप्सचं वजन वाढतच चाललं होतं. क्रिस्टीनावर गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियाही करण्यात आली. डॉक्टरांनी तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. क्रिस्टीनाला चिंता होती की, लठ्ठपणामुळे तिला अपंगत्व येईल. लठ्ठपणामुळे तिला शारीरिकचं नाही तर अनेक मानसिक समस्यांना ही सामोरं जावं लागत होतं. तिला लठ्ठपणामुळे दोन पावलं चालणं आणि श्वास घेणंही कठीण झालं होतं. 'द सन' वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, अमेरिकन टीव्ही सीरिजच्या प्रोड्युसरला सांगितलं होतं की, ती या शरीरामध्ये अडकली आहे. तिला या शरीरातून बाहेर पडायचं आहे. लठ्ठपणामुळे ती घरबाहेरही पडू शकत नाही. 'द सन' रिपोर्टनुसार, जगातील लठ्ठ महिला क्रिस्टीनाने आता तिच्या वजनाच्या दोन तृतियांश वजन कमी केलं आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे बदललं आयुष्य
क्रिस्टीनाने तिच्या लठ्ठपणासाठी तिची आई आणि पतीला दोष देत म्हटले की, त्यांनी मला भरपूर फास्ट फूड खायला दिलं. तिला वजन कमी करण्याची इच्छा होती. यानंतर क्रिस्टीनाला एक सर्जन डॉ. युनान नौझारदान सापडले. डॉ. नौझारदान यांनी क्रिस्टीनाला सांगितलं की, गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रियेसाठी तिला प्रथम वजन कमी करावं लागेल. डॉक्टरांनी क्रिस्टीनाला डाएट चार्ट बनवून दिला आणि व्यायाम करण्यास सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे क्रिस्टीनाचं आयुष्य बदललं. डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रिस्टीनाचे वजन सुमारे 500 पौंड (226.796 किलो) वर आलं. 2014 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी क्रिस्टीनवर गॅस्ट्रिक बायपास सर्जरी झाली होती.
एकेकाळी जगातील सर्वात लठ्ठ असणारी महिला आज सुंदर दिसणारी महिला आहे. क्रिस्टीनाने 317 किलोवरून सुमारे 200 किलोहून अधिक वजन कमी केलं आहे. आता क्रिस्टीनाचं वजन 185 पाऊंड म्हणजे 83 किलो आहे. सोशल मीडिया पोस्ट शेअर करत क्रिस्टीनाने तिची वजन कमी करण्याचा प्रेरणादायी प्रवास सांगितला आहे.