Elon Musk Statue In Canada : जगातील श्रीमंत व्यक्ती, टेस्लाचे ( Tesle ) सीईओ आणि ट्विटरचे ( Twitter ) मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) यांच्या चाहत्यांनी चक्क एलॉन मस्क यांचा पुतळा ( Elon Musk's Fans Build Statue ) उभारला आहे. मस्क यांच्या चाहत्यांनी त्यांच्या सन्मानार्थ 30 फूट लांब पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याची उंची 5 फूट 9 इंच आहे आणि रॉकेटवर बसलेल्या बकरीच्या शरीरावर मस्क यांचा हुबेहुब चेहरा तयार करुन लावण्यात आला आहे. हा पुतळा बनवण्यासाठी 4.8 कोटी रुपये खर्चं आला आहे. या पुतळ्याला या चाहत्यांनी Elon GOAT Token असं नाव दिलं आहे. 


मस्क यांचा 30 फूट लांब ॲल्युमिनीअमचा पुतळा


एलॉन मस्क यांचा हा पुतळा कॅनडामधील ( Canada ) धातू मूर्तिकार केविन आणि मिशेल स्टोन यांनी मस्क यांचा हा ॲल्युमिनीअमचा पुतळा बनवला आहे. Elon GOAT Token ( EGT ) पुतळा मस्क यांना म्हणून भेट देण्याची या चाहत्यांची योजना आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केविन आणि मिशेल स्टोन 26 नोव्हेंबर रोजी हा पुतळा टेस्लाच्या टेक्सास येथील मुख्यालयात नेऊन त्यांना भेट म्हणून देणार आहेत.


एलॉन मस्क यांच्या पुतळ्याचे अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.






मस्क यांचा पुतळा बनवण्यामागे 'हे' आहे कारण
 
मूर्तिकार केविन आणि मिशेल स्टोन यांनी सांगितलं की, एलॉन मस्क हे जगातील श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं आहे. त्यामुळे ते GOAT- ग्रेट ऑफ ऑल टाइम आहेत. रॉकेट त्यावर बकरीचं शरीर आणि त्यावर मस्क यांचा चेहरा असं या पुतळ्याचं स्वरूप आहे. यामुळे आम्ही त्यांच्या सन्मानार्थ मस्क यांचा हा ॲल्युमिनीअमचा पुतळा उभारला आहे. मीडिया रिपोर्टनुसार EGT या पुतळ्याचा ट्रेलरवरून अमेरिकेत दौरा करण्यात आला आहे. 


ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क नेहमीच चर्चेत


जगातील श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क कायम चर्चेत असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमीच व्हायरल होतात. अलिकडेच मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांमुळे मस्क प्रचंड चर्चेत आहेत. ट्विटर कंपनीमधील नोकरकपात, ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन हे मुद्दे चर्चेचा विषय ठरले आहेत. आता मस्क यांनी ब्लू टिक पेड सर्व्हिस बंद केल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.