Tesla Inc. आणि Space X चे संस्थापक एलन मस्क (Elon Musk) यांच्यासाठी 2021 या नव्या वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थानं धमाकेदार झाली आहे. कारणही तसंच आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये Elon Musk यांना सर्वात वरचं, अर्थात अग्रस्थान मिळालं आहे. इलेक्र्टीक कार निर्मात्यांच्या शेअरची किंमत गुरुवारी 4.8 टक्क्यांनी तेजीत पाहायला मिळाली. ज्यामुळं मस्क यांनी Amazon.com Inc चे संस्थापक जेफ बेजोस यांना पछाडत ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्समध्ये अग्रस्थानी पोहोचले आहेत. जगातील 500 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.

Continues below advertisement

मूळच्या दक्षिण आफ्रिकेच्या असणाऱ्या या इंजिनिअरचं नेट वर्थ न्यूयॉर्कमध्ये सकाळी 10:15 वाजण्याच्या सुमारास 188.5 बिलियन डॉलर इतकी होती. हा आकडा बेजोस यांच्या तुलनेत $ 1.5 बिलियननं जास्त आहे. बेजोस या यादीत 2017 पासून अग्रस्थानी होते. पण, आता मात्र त्यांची क्रमवारी घसरली आहे.

स्पेस एक्सपलोरेशन टेक्नोलॉजी कॉरपोरेशन किंवा स्पेस एक्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर असणारे मस्क हे प्रायव्हेट स्पेस क्षेत्रात बेजोस यांचे प्रतिस्पर्धी आहेत. बेजोस यांच्याकडे ब्लू ऑरिजिन LLC ची मालकी आहे.

Continues below advertisement

कोरोना व्हायरसवरील प्रतिबंधात्मक लसीच्या ड्राय रन संबंधीची महत्त्वाची माहिती एका क्लिकवर... 

मागील 12 महिन्यांचा आढावा घेतल्यास हा काळ मस्क यांच्यासाठी खास ठरला. मागील वर्षी त्यांच्या वार्षिक मिळकतीत तब्बल 150 अब्ज डॉलर्सनं वाढ झाली. आतापर्यंत ही सर्वाधित वेगानं झालेली वाढ ठरत आहे. मिळकतीत झपाट्यानं वाढ होण्यामागे टेस्लाच्या शेअरमध्ये आलेली अनपेक्षित तेजी हे मुख्य कारण आहे. मागील यामध्ये 743 टक्क्यांनी वाढ झाली. दरम्यान, 2020 मधील नोव्हेंबर महिन्यातच मस्क यांनी बिल गेट्स यांना मागे टाकत जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं होतं.