मुंबई: संपूर्ण जगाची नजर लागून असलेल्या अमेरिकेच्या नव्या राष्ट्राध्यक्षपदाची निवड करण्यासाठी आज मतदान होणार आहे. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन, तर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प मैदानात आहेत. मतदानाला भारतीयवेळेनुसार 10.30 वाजता सुरुवात झाली. हिलरी क्लिंटन या न्यूयॉर्कच्या शपाकुआमध्ये, तर डोनाल्ड ट्रम्प न्यूयॉर्क सिटीमध्ये मतदान करतील.

मतदान पार पडल्यानंतर रात्रीपासून मतमोजणी होऊन निकाल यायला सुरुवात होईल, उद्या म्हणजेच बुधवारी सकाळपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

ओबामांचा हिलरी क्लिंटन यांना पाठिंबा

या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलेरी क्लिंटन यांना समर्थन दिले आहे. त्यांनी स्वत: निवडणुक प्रचारात उतरुन अमेरिकन जनतेला डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलेरी क्लिंटन यांनाच मतदान करण्याचे आवाहन अमेरिकन जनतेला केले होते. त्यांनी आपल्या भाषणात अमेरिकन जनतेकडे महिला राष्ट्राध्यक्ष निवडीची संधी असून ती दौडू नये असे सांगितले आहे.

अमेरिकेत वसलेल्या भारतीय वंशाचे हॉटेल उद्योजक संत सिंह चटवाला यांनीही हिलरी क्लिंटन यांना समर्थन दिले असून, या निवडणुकीत हिलरींचा विजय भारतासाठी फायद्याचे असल्याचे सांगितले आहे.

विविध सर्वेमध्ये हिलरी क्लिंटन यांची आघाडी

दरम्यान, अमेरिकेतील सर्वच सर्वेक्षणांनी हिलरी क्लिंटन यांच्याच बाजूने कौल दिला आहे. न्यूयॉर्क टाईम्सने हिलरी क्लिंटन 45.3 % तर डोनाल्ड ट्रम्प 43% टक्के राष्ट्राध्यक्ष बनतील असे सांगितले आहे. तर रियर क्लियर पॉलिटिक्सच्या सर्वेनुसार, हिलरी क्लिंटन या 46.3% तर ट्रम्प हे 44.4% राष्ट्राध्यक्ष होतील असे सांगितले. एबीसी बॉशिंग्टन पोस्टनेही हिलरी क्लिंटन यांच्याच बाजूने कौल दिला आहे. तर रॉयटर्स-इप्सस यांनीही हिलरी क्लिंटनच राष्ट्राध्यक्ष होणार असे सांगितले आहे.

30 कोटी नागरिक करणार मतदान

या निवडणुकीत एकूण 30 कोटी मतदार मतदान करणार असून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारात भारतीयांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांनी न्यूजर्सीमध्ये रिपब्लिकन हिंदू कोलिशनने आयोजित कार्यक्रमात सहभाग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुक्त कंठाने स्तूती करत निवडून आलो तर मोदींसारखे काम करेन असे सांगितले. विशेष म्हणजे, निवडणुकीच्या तोंडावर ट्रम्प यांनी मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत वापरलेला ‘अबकी बार’च्या नाऱ्याचा वापर करत 'अब की बार ट्रम्प सरकार'चा नारा दिला.

निवडणुकीचे निकाल बुधवारी सकाळपर्यंत हाती येणार असून, निवडून येणारा उमेदवार 20 जानेवारी 2017 रोजी व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारेल.

भारतातही परिणाम

दरम्यान, या निवडणुकीचा परिणाम भारतातही दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील अखिल भारतीय हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयासाठी होम-हवन सुरु केला आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात हिलरी क्लिंटन यांच्या विजयासाठी पूजा केली जात आहे.

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द

हिलरी क्लिंटन यांची कारकीर्द

स्पेशल रिपोर्ट : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होईल?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत संशयित व्यक्ती घुसल्याने गोंधळ

आधी मोदींची स्तुती, आता घोषणांचीही कॉपी

निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं