संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्वीट करुन याची माहिती दिली होती. कल्पना सरोज फाऊंडेशन आणि फाउंडेशन फॉर ह्यूमन होराइजनच्या मदतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीचं वर्ष असल्यामुळे या या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने असमानता दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, यावर परिसंवादही होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं होतं. आंबेडकरांनी आयुष्यभर दलित आणि वंचितांच्या अधिकारांसाठी संघर्ष केला.