प्रिन्स विल्यम आणि केट यांना पंतप्रधानांतर्फे शाही भोजन
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2016 02:27 PM (IST)
नवी दिल्ली : ब्रिटनचे प्रिन्स विल्यम आणि त्यांची पत्नी केट मिडलटन यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या शाही जोडप्याने पंतप्रधानांसोबत जेवणाचा आस्वादही घेतला. 'दिल्लीमध्ये रॉयल समर अवतरलं आहे. पंतप्रधानांनी हैदराबाद हाऊसमध्ये ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज यांचं यजमानपद भूषवलं' अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी ट्विटरवर दिली आहे. https://twitter.com/MEAIndia/status/719794714820681728 प्रिन्स विलियम्स आणि केट यांनी स्नेहभोजनानंतर काझीरंगा नॅशनल पार्कलाही भेट दिली. सोमवारी इंडिया गेटवरच्या अमर जवान ज्योतीला पुष्पचक्र अर्पण केलं. त्यानंतर राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवरही श्रद्धांजली वाहिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील मोदींच्या ब्रिटन दौऱ्यात क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनी पंतप्रधानांना लंचसाठी निमंत्रित केलं होतं. पुढच्या आठवड्यात असलेल्या एलिझाबेथ राणीच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त ब्रिटीश हायकमिशनरने सोमवारी रिसेप्शन आयोजित केलं होतं.