न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीत इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरचा मुद्दा पुढे केला. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर इम्रान खान यांना पुन्हा एकदा अपयश आहे. भारताची तयारी असेल तरच काश्मीर प्रश्नावर अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं.


जम्मू-काश्मीरचा मुद्दा गुंतागुंतीचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. दोन्ही देशांची सहमती असेल तर अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं ट्रम्प यांनी इम्रान खान यांना सांगितलं. मात्र काश्मीर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील द्विपक्षीय मुद्दा आहे. दोन्ही देश मिळून हा प्रश्न सोडवतील. शिमला आणि लाहोर कराराप्रमाणे द्विपक्षीय चर्चेने काश्मीर प्रश्न सोडवला जाऊ शकतो. त्यामुळे इतर कुणीही यामध्ये हस्तक्षेप करण्यास भारताचा विरोध आहे.



केवळ इम्रान खान तयार असून चालणार नाही. भारतही त्यासाठी तयार असणे आवश्यक आहे. आम्हाला आशा आहे की, दोन्ही देश एकमेकांशी चर्चा करुन जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवतील. दोन्ही देशांसाठी विकासाच्या दृष्टीने ते गरजेचं आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं.


याआधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपल्याकडे मदत मागितली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळून लावला होता.


संबंधित बातम्या