वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा पेच निर्माण झालाय. अमेरिकेच्या या मान्यतेला युरोपियन युनियन आणि युनायटेड नेशन्स या दोघांनी विरोध दर्शवलाय.


शिवाय दोन्ही आंतरराष्ट्रीय संघटनांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दूतावास तेल अवीवहून जेरुसलेमला स्थलांतरित करण्याच्या निर्णयाला सावध इशारा दिला आहे. तर अमेरिकेच्या इस्रायलच्या बाजूने दिलेल्या मान्यतेला अरब आणि मुस्लिम देशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

जेरुसलेम शहरावर इस्रायल आणि पॅलेस्टाइन या दोन्ही देशांनी दावा केला आहे. तर पॅलेस्टिनियन्सने अमेरिकच्या शांततादूत म्हणून भूमिका बजावण्यावरच सवाल उठवला आहे. यासोबतच अमेरिकेशी चांगले संबंध असणाऱ्या फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन या देशांनी अमेरिकेच्या जेरुसलेमवरील पावलावर आक्षेप नोंदवला आहे.