न्यूयॉर्क: अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी काल व्हाईट हाऊसमध्ये आपले उत्तराधिकारी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.

ओबामांची भेट एक सन्मानाची गोष्ट होती, असं नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. तर आमची भेट 'शानदार' होती असं ओबामा म्हणाले.

यावेळी ट्रम्प आणि ओबामा यांच्यात अनेक मुद्द्यांवर जवळपास दीड तास चर्चा झाली. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पूर्ण पाठिंबा देत, त्यांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं ओबामा यांनी स्पष्ट केलं.

ओबामांसोबतच्या चर्चेतून अनेक मुद्द्यांविषयी माहिती मिळाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं.

'व्हाईट हाऊस'मधल्या या भेटीदरम्यान ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामा आणि ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांचीही भेट झाली.