मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत एक अजब गोष्ट गुगलवर दिसत आहे. ‘इडियट’ असा शब्द सर्च केल्यावर गुगलवर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो दाखवण्यात येत आहे.

‘सर्वाधिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीपैकी मी एक आहे,’ असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.  पण गुगलवर आता ‘इडियट’ या शब्दावर येत असलेल्या उत्तराने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.

‘इडियट’ असं टाईप केल्यावर ट्रम्प यांचा येणारा फोटो हा ‘बेबीस्पिटल’ या वेबसाईटचा आहे. ‘बेबीस्पिटल’ ही अमेरिकेतील एक ब्लॉग वेबसाईट आहे. ही वेबसाईट रुढीवादी आणि त्यांच्याकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांचा शोध घेण्याचं काम करते.

दरम्यान, भारतातही अनेक मोठ्या व्यक्तींना धक्का देणारी माहिती गुगलवर दाखवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी ‘फेकू’ असं सर्च करताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव येत होतं. तसंच ‘सर्वात वाईट अभिनेता कोण’ असं विचारताच गुगलवर सलमान खानचं नाव आलं होतं.