सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या विशाल समुद्रात सर्फिंग करत असताना अचानक एका लहानग्यावर डॉल्फिनने हल्ला केला, सुदैवाने तो या तडाख्यातून बचावलाही. विशेष म्हणजे हा सारा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ऑस्ट्रेलियातली ही घटना म्हणजे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती याचं जिवंत उदाहरण. ऑस्ट्रेलियातला तेरा वर्षांचा जेड आपल्या सर्फबोर्डसह समुद्रात सर्फिंगसाठी उतरला. मोठमोठ्या लाटांवर लीलया स्वार होत होता. मात्र किनाऱ्यावर पोहचत असतानाच घात झाला.

जेड इतक्याच सुसाट वेगाने एक डॉल्फिन त्याच्या मार्गात आला. जेडला काही समजण्याच्या आतच डॉल्फिनचा एक तडाखा त्याच्या खांद्यावर आणि पाठीवर बसला. सुदैवाने सर्फबोर्डवरुन पडल्यामुळे जेड वाचला.

विशेष म्हणजे जेडच्या वडिलांनीच हा व्हिडिओ शूट केला आहे. तसं तर हल्ली आपल्याला प्रत्येक क्षण कॅमेरात कैद करण्याची सवय लागली आहे. मात्र असा काही व्हिडिओ शूट होईल याचा विचार जेडने आणि त्याच्या वडिलांनीही कधी केला नसेल...!

पाहा व्हिडिओ :