न्यूयॉर्कः प्रकाशाच्या सणाचा उत्साह देशासोबतच परदेशातही पहायला मिळतोय. सातासमुद्रापार पोहोचलेला दिवाळीचा सण यंदा चक्क संयुक्त राष्ट्रात साजरा करण्यात येतोय. संयुक्त राष्ट्रात साजरी होणारी ही पहिलीच दिवाळी आहे.


संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याठिकाणी पणतीसह हॅप्पी दिवाळी असं लिहिण्यात आलंय. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयातही दिवाळीचा उत्साह पहायला मिळतोय.

संयुक्त राष्ट्रसंघात दिवाळी साजरी करण्याच्या निर्णयाचं भारताकडूनही स्वागत करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रातील भारताचे अॅम्बेसेडर सय्यद अकबरुद्दीन यांनी या निर्णयाबद्दल ट्विटरवरुन संयुक्त राष्ट्राच्या आमसभेचे अध्यक्ष पीटर थॉमसन यांचे आभार मानले.

पाहा या बातमीचे आणखी फोटो