Denmark Firing : डेन्मार्कची राजधानी कोपेनहेगनमधील (Firing Copenhagen) एका शॉपिंग मॉलमध्ये गोळाबाराची घटना घडली आहे. या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये गोळीबार सुरु झाल्यावर गोंधळ उडाला. लोक सैरावैरा पळू लागले. अनेकांनी मॉलमधून बाहेर पळ काढण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन ते चार राऊड फायरिंग करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, मॉल जवळील परिसरात फिरु नये.


गोळीबारामध्ये जखमी झालेल्यांना कोपेनहेगनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोपनहेगनच्या महापौर सोफी हेस्टोर्प अँडरसन (Sophie Haestorp Andersen) यांनी सांगितलं आहे की, 'ही घटना अतिशय धक्कादायक आणि अत्यंत गंभीर बाब आहे.' रविवारी ब्रिटीश पॉप स्टार हॅरी स्टाइल्स मॉलजवळील रॉयल एरिना येथे रात्री 11 वाजता एक मोठा कॉन्सर्ट होणार आहे. सध्या डॅनिश पोलिसांनी या कॉन्सर्टसाठी आयोजकांना परवानगी दिली आहे.






अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबारात दोघांचा मृत्यू 


अमेरिकेतील टेक्सासमध्ये रविवारी रात्री गोळीबारामुळे खळबळ उडाली होती. डॅलस फोर्ट परिसरात एका व्यक्तीनं दोन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी गोळीबारही केला, मात्र हल्लेखोरानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.


टेक्सासच्या स्थानिक वेळेनुसार ही घटना शनिवारी संध्याकाळी 6.45 वाजता घडली. डॅलस फोर्ट परिसरात अचानक गोळीबाराचा आवाज आला. पोलीस तेथे पोहोचल्यावर हल्लेखोराने पोलिसांवरही गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला चौफेर घेरले हे पाहून आरोपीनं डॅलस फोर्ट परिसरात गोळी झाडून आत्महत्या केली. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपास करत आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या