मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ब्रिटन सरकारनं मोठा झटका दिला आहे. ब्रिटनने दाऊदवर आर्थिक निर्बंध लादले असून त्याची सर्व बँक खाती आणि मालमत्ता गोठवण्यात येणार आहे. आर्थिक निर्बंधांमुळे दाऊद आता ब्रिटनमध्ये कोणताही व्यवसाय करु शकणार नाही.
'फायनॅन्शिअल सँक्शन्स टार्गेट्स इन द युके' अशा नावाने जाहीर केलेल्या यादीत दाऊद हिट लिस्टवर आहे. या यादीत पाकिस्तानातील दाऊद राहत असलेल्या 3 पत्त्यांचा आणि त्याच्या 21 बनावट नावांचाही समावेश आहे.
पहिला पत्ता : घर क्रमांक 37, गल्ली क्रमांक 30, डिफेन्स हाऊसिंग ऑथरिटी, कराची, पाकिस्तान
दुसरा पत्ता : नुराबाद, कराची, पाकिस्तान
तिसरा पत्ता : व्हाईट हाऊस, सौदी मशिदजवळ, क्लिफटर, कराची
ब्रिटनच्या रेकॉर्डनुसार दाऊद इब्राहिम हा भारतीय असून मूळचा तो महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडचा राहणारा आहे. दाऊदच्या आई-वडिलांसह त्याची पत्नी महजबी शेखचाही उल्लेख आहे. दाऊदच्या पत्नीची हिजरत आणि मुक्कहद अशी आणखी दोन नावंही देण्यात आली आहेत.
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या दाऊदचा पासपोर्ट भारताने रद्द केला आहे. यामुळे दाऊदकडे आता पाकिस्तानचा पासपोर्ट आहे. पाकिस्तानच्या पासपोर्टवरच दाऊद दुबईसह इतर ठिकाणांवर फिरत असल्याचा उल्लेख आहे.
ब्रिटनचा दाऊदला धक्का, संपत्ती आणि बँक खात्यांवर टाच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2017 12:11 PM (IST)
'फायनॅन्शिअल सँक्शन्स टार्गेट्स इन द युके'ने जाहीर केलेल्या यादीत पाकिस्तानातील दाऊद राहत असलेल्या 3 पत्त्यांचा आणि त्याच्या 21 बनावट नावांचाही समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -