भाई एकदम फिट हैं : छोटा शकील
एबीपी माझा वेब टीम | 26 Apr 2016 10:42 AM (IST)
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पाय कापावा लागणार असल्याचं वृत्त छोटा शकीलने फेटाळलं आहे. छोटा शकील हा दाऊद इब्राहिमचा राईट हॅण्ड म्हणून ओळखला जातो. एका इंग्लिश वृत्तपत्राशी बोलताना छोटा शकील म्हणाला की, 'भाई एकदम फिट हैं.' ही निव्वळ अफवा सोमवारी दिलेल्या माहितीनुसार दाऊद इब्राहिमला गँगरीन झाल्याची बात्तमी आली होती,त्याचा पायही कापण्याची शक्यता आहे असी माहिती मिळाली होती. "मात्र दाऊदच्या आजाराची निव्वळ अफवा आहे. तुमच्या एजन्सीकडे चुकीची माहिती आहे. ती केवळ अफवा आहे. भाई अगदी ठणठणीत आहेत," असं छोटा शकीलने सांगितलं.