अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा पाय कापावा लागणार : सूत्र
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2016 04:39 PM (IST)
नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे. मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पायाला गँगरीन झालं असल्याने पाय कापावं लागणार आहे, अशी माहिती मिळते आहे. दक्षिण कराचीमधील शहर-ए-फिरदोस हॉस्पिटलमध्ये दाऊद इब्राहिमवर उपचार सुरु आहेत. दाऊदवर एकदा शस्त्रक्रिया झाल्याचीही माहिती मिळते आहे. मात्र, त्याच्या पायामधील गँगरीन वाढत जात आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, दाऊदच्या पायातील गँगरीन गुडघ्यापर्यंत पोहोचलं असून, त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दाऊदचं पाय कापण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपूर्वी घरात फिरताना दाऊदच्या पायाला दुखापत झाली होती, अशी माहिती मिळते आहे.