मिनाहासा (इंडोनेशिया) : अनधिकृतपणे पाळलेल्या मगरीने महिलेला जिवंत खाल्ल्याचा प्रकार इंडोनेशियात समोर आला आहे. मिनाहासा भागातील सुलावेसी बेटावर घडलेल्या प्रकारात 44 वर्षीय डेझी टूवू या महिलेचा मृत्यू झाला.
पर्ल फार्ममधील लॅब प्रमुख असलेल्या डेझी यांना 14 फूट लांब मगरीने खाल्लं. सहकारी महिलेला दुसऱ्या दिवशी डेझी यांचा अर्धवट मृतदेह सर्वप्रथम आढळला. पर्ल फार्ममध्ये या मगरीला अनधिकृतपणे ठेवण्यात आलं होतं.
मगरीला खाऊ घालताना डेझी अपघाताने पिंजऱ्यात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तीन तासांच्या प्रयत्नानंतर मगरीला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आलं.
संबंधित मगरीचं 'मेरी' असं नामकरण करण्यात आलं असून तिचं वजन जवळपास दीड हजार पाऊण्ड होतं. मगरीने महिलेचा हात आणि पोटाचा बहुतांश भाग खाल्ला होता. तिच्या पोटात काही अवशेष आढळण्याची शक्यता आहे.
अनधिकृतपणे पाळलेल्या मगरीने महिलेला जिवंत खाल्लं!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jan 2019 09:16 AM (IST)
मगरीला खाऊ घालताना 44 वर्षीय डेझी अपघाताने पिंजऱ्यात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडोनेशियातील सुलावेसी बेटांवर हा दुर्दैवी प्रकार घडला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -