बीजिंग : महागडे शौक पूर्ण करण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल सांगता येत नाही. मात्र हेच शौक चीनमधील एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहेत. आयफोन आणि आयपॅड विकत घेण्यासाठी स्वतःची किडनी विकणारा अल्पवयीन तरुण अंथरुणाला खिळून आहे. अवयव निकामी झाल्यामुळे अवघ्या 17 वर्षांच्या वांग शांगकुनची बिकट अवस्था झाली आहे.
2011 साली म्हणजेच वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वांगने किडनी विकण्याचा चमत्कारिक निर्णय घेतला होता. अॅपल कंपनीच्या गॅझेटच्या प्रेमात वांग आंधळा झाला होता. त्यामुळे आयफोन आणि आयपॅड विकत घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करायला वांगने किडनी विकली.
एप्रिल 2011 मध्ये वांगला साडेचार हजार ऑस्ट्रेलियन डॉलर (सध्याच्या दरानुसार अंदाजे सव्वा दोन लाख रुपये) मिळाले होते. त्या मोबदल्यात त्याने आयफोन 4 आणि आयपॅड 2 विकत घेतले होते.
वांगने ऑपरेशन करुन काळ्या बाजारात उजवं मूत्रपिंड विकलं होतं. या प्रकरणी नऊ जणांना 2012 मध्ये तुरुंगवास ठोठावण्यात आला होता. यामध्ये पाच सर्जन्सचा समावेश होता.
शस्त्रक्रियेनंतर काही काळातच वांगला किडनीसंबंधित आजार झाल्याचं वृ्त्त चिनी मीडियाने दिलं होतं. ऑपरेशनच्या वेळी असलेल्या अस्वच्छतेमुळे त्याला संसर्ग झाल्याचं म्हटलं गेलं होतं.
आयफोनसाठी किडनी विकणारा तरुण अंथरुणाला खिळून
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jan 2019 02:23 PM (IST)
2011 साली म्हणजेच वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी वांगने किडनी विकण्याचा निर्णय घेतला होता. आयफोन आणि आयपॅड विकत घेण्यासाठी पैशांची जुळवाजुळव करायला वांगने किडनी विकली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -