Crime News : अमेरिकेहून ब्रिटनसाठी उड्डाण केलेल्या विमानात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील न्यू जर्सीहून लंडनला जाणाऱ्या विमानातील बिझनेस क्लासमध्ये एका महिला प्रवाशावर बलात्कार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपीला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला.


ही घटना युनायटेड एअरलाइन्सच्या विमानात घडली आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, घटनेच्या वेळी इतर प्रवासी झोपले होते.  या घटनेनंतर पीडित महिलेने एअरलाइन्स कर्मचाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर एअरलाइन्स कर्मचाऱ्यांनी ब्रिटन पोलिसांना माहिती दिली. न्यू जर्सी ते लंडन दरम्यानच्या थेट विमान प्रवासासाठी सुमारे 7 तास लागतात.


विमान ब्रिटन येथील हिथ्रो येथे उतरल्यानंतर पोलीस अधिकारी विमानात आले आणि आरोपीला अटक केली. पीडितेला समुपदेशनासाठी नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी विमानाची फॉरेन्सिक तपासणीही केली. ही घटना गेल्या आठवड्यातील सोमवारची आहे. पीडित महिला आणि आरोपी दोघांचे वय 40 वर्षे आहे.


 


news.sky.com च्या रिपोर्टनुसार, आरोपी व्यक्ती ब्रिटनचा रहिवासी आहे आणि पीडित महिला देखील ब्रिटनची असल्याचे सांगण्यात येत आहे. द सनच्या वृत्तानुसार, आरोपी आणि पीडित तरुणी बिझनेस क्लासच्या सीटच्या वेगवेगळ्या रांगेत होते. दोघांची आधीपासून ओळख नव्हती. मात्र घटना घडण्यापूर्वी पीडित तरुणी आणि आरोपीने लाऊंज परिसरात एकत्र मद्यपान केले आणि त्यांच्यात काही वेळ चर्चादेखील झाली होती. 





ब्रिटीश पोलिसांनी अटकेला दुजोरा दिला असून या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असल्याचे सांगितले आहे. विमानामध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दुर्मिळ मानल्या जातात. तथापि, काही अहवालांनुसार, अलीकडच्या काळात अमेरिकेत विमानात लैंगिक हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha