Covid Vaccine US : जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा सर्वाधिक फटका जगातील महासत्ता असणाऱ्या अमेरिकेला बसला आहे. परंतु, आता अमेरिकेची परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. अशातच अमेरिकेत लहान मुलांची लसीची (Covid 19 Vaccine) वाट पाहणाऱ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. अमेरिकेत 8 नोव्हेंबरपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होता आहे. अमेरिकेतील लहान मुलांना फायझर लसीचा डोस देण्यात येणार आहे. याबाबत बोलताना राष्ट्रपती जो बायडन (Joe Biden) यांनी म्हटलंय की, हा आपल्यासाठी एक 'टर्निंग पॉईंट' आहे.
कोरोना विरोधातील लढाईत आपण एका महत्त्वाच्या वळावर पोहोचलोय : बायडन
वृत्तसंस्था एएफपीनं सेंटर्स फॉर डिजिटल कंट्रोल अँड प्रिवेंशनचा हवाला देत म्हटलंय की, अमेरिकेत 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी कोविड-19ची सुरुवात करु शकतो. अमेरिकेच्या सल्लागारांनी एकमतानं या निर्णयाचे समर्थन केल्यानंतर काही तासांनी ही घोषणा झाली. व्हाइट हाउच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या वक्तव्यानुसार, जो बायडन म्हणाले की, आज आपण कोरोनाविरोधात एका लढाईत महत्त्वाच्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत."
राष्ट्रपती बायडन म्हणाले की, "महिन्यानंतर अमेरिकेत लहान मुलांसाठीच्या लसीची वाट पाहणाऱ्या पालकांचा प्रतिक्षा संपली आहे. अमेरिकेनं घेतलेला हा निर्णय लहान मुलांद्वारे दुसऱ्यांपर्यंत व्हायरस पसरणाऱ्याची शक्यता कमी करतो. व्हायरसला हरवण्यासाठी आपली लाढाई आपल्या देशासाठी एक मोठं पाऊल आहे."
फायझरच्या आपातकालीन उपयोगाची परवानगी
दरम्यान, अमेरिकी खाद्य आणि औषधी प्रशासनानं शुक्रवारी 5 ते 11 वर्षांच्या मुलांमधील लसीकरणाच्या आपातकालीन वापराची परवानगी दिली होती. एफडीएनं लहान मुलांसाठी फायझरच्या लसीचा 10 मायक्रोग्रामचा डोस अधिकृत केला आहे. तसेच 12 वर्ष आणि त्याहून जास्त वयाच्या मुलांसाठी 30 मायक्रोग्रामचा डोस देण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :