नवी दिल्ली : जगभरातील कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या आणि मृतांच्या आखड्यात झपाट्याने वाढ होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जगभरात 21 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर मृतांचा आकडा 1.45 लाखांवर पोहोचला आहे. तर संपूर्ण जगात 5 लाखांहून अधिक लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
24 तासांमध्ये सर्वाधिक संसर्ग झालेले देश
देश | एकूण कोरोनाग्रस्त | नवीन कोरोनाग्रस्त |
अमेरिका | 677,056 | +29,053 |
फ्रान्स | 165,027 | +17,164 |
टर्की | 74,193 | +4,801 |
ब्रिटन | 103,093 | +4,617 |
स्पेन | 184,948 | +4,289 |
24 तासांमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेले देश
देश | एकूण मृत्यू | गेल्या 24 तासांत मृत्यू |
अमेरिका | 34,580 | +2,137 |
ब्रिटन | 13,729 | +861 |
फ्रान्स | 17,920 | +753 |
इटली | 22,170 | +525 |
स्पेन | 19,315 | +503 |
जाणून घ्या 24 तासांत कोरोनाने जगभरात काय बदललं?
जगभरात कोरोना व्हायरसमुळे दररोज नवीन बदल पाहायला मिळत आहेत. अमेरिकेमध्ये उद्या न्यूयॉर्कमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरांनी याबाबत माहिती दिली. याआधी त्यांनी न्यूयॉर्क शहरामध्ये सर्वांना मास्त घालणं अनिर्वाय असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, न्यूयॉर्क शहर अमेरिकेतील कोरोनाचं केंद्र बनलं आहे.
याव्यतिरिक्त ब्रिटनमध्ये लॉकडाऊन 3 आठवड्यांनी वाढवला आहे. ब्रिटनचे विदेश सचिव डॉमनिक राब यांनी याबाबत डाउनिंग स्ट्रीट येथून घोषणा केली. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झाले असून ते सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आराम करत आहेत. त्यामुळे डॉमनिक राब यांनी यासंदर्भात घोषणा केली. तसेच यासंदर्भात बोलताना त्यांनी, कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन वाढवणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं.
ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी तेथील आरोग्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकलं. दोघांमध्ये कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी घालण्यात आलेल्या नियमावलीवरून मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान राष्ट्रपती जायर बोल्सोनारो आणि आरोग्यमंत्री लुईज हेनरिक मॅन्डेटा यांच्यातील मतभेद सार्वजनिक रित्याही पाहायला मिळाले होते. ब्राझीलचे आरोग्यमंत्री सतत सोशल डिस्टंन्सिंग आणि आयसोलेशन महत्त्वाचं असल्याचे सांगत होते. तर राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी ब्राझीलची अर्थव्यवस्था जास्त महत्त्वाची असल्याचं सांगितलं.
संबंधित बातम्या :
दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू
Coronavirus | अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखला!Coronavirus | ब्रिटनच्या पंतप्रधानांची कोरोनावर मात, बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज
Coronavirus | कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अमेरिकेतील 50 राज्यांत आपत्ती कायदा लागू