- फ्रांस: कोरोनाबाधित- 166,420, मृत्यू - 24,087
- यूके: कोरोनाबाधित- 165,221, मृत्यू - 26,097
- जर्मनी: कोरोनाबाधित- 161,539, मृत्यू - 6,467
- टर्की: कोरोनाबाधित- 117,589, मृत्यू - 3,081
- रशिया: कोरोनाबाधित- 99,399, मृत्यू - 972
- इरान: कोरोनाबाधित- 93,657 मृत्यू - 5,957
- चीन: कोरोनाबाधित- 82,858, मृत्यू - 4,633
- ब्राझिल: कोरोनाबाधित- 79,361 मृत्यू - 5,511
- कॅनडा: कोरोनाबाधित- 51,597, मृत्यू - 2,996
- भारत - कोरोनाबाधित- 33062, मृत्यू - 1079
Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 32 लाखांवर तर 10 लाख रुग्ण बरे
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2020 07:43 AM (IST)
जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 32 लाखांच्या वर पोहोचला आहे.
मुंबई : जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2 लाख 28 हजारांच्या वर पोहोचली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात 2 लाख 28 हजार 190लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 32 लाख 19 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 10 लाख रुग्ण बरे झाले आहेत. मागील 24 तासात 81,319 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर 6,538 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील 210 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. अमेरिकेने गेल्या २४ तासात २,३९० लोक गमावले, एकूण बळी ६१ हजार ६५६, रुग्णांची संख्या १० लाख ६४ हजार १९० इतकी झाली आहे. न्यूयॉर्क प्रांतात काल ३३० बळी, तिथे एकूण मृतांचा आकडा २३,४७४ तर रुग्णांची संख्या ३ लाख ६ हजार १६८इतकी आहे. त्या खालोखाल न्यूजर्सीत ६,७७०, मिशिगन मध्ये ३,६७०, मासाचुसेट्स ३,४०७, पेनसिल्वानिया २३५४, , इलिनॉईस २२१५, कनेक्टिकट २१६८, कॅलिफोर्निया १९३९, लुझियाना १८४५, फ्लोरिडा १२१८,आणि वॉशिंग्टनमध्ये ८०१ लोकांचा बळी या रोगाने घेतलाय. स्पेनने गेल्या चोवीस तासात ४५३ लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा २४ हजार २७५ वर पोहोचला आहे. काल इटलीत कोविड-१९ रोगाने ३२३ माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या २७ हजार ६८२ इतकी आहे तर काल रुग्णांची संख्या २ हजार ८६ ने वाढली, इटलीत आता जवळपास २ लाख ३ हजार ५०० रुग्ण आहेत. काल इंग्लंडने ७९५ माणसं गमावली मात्र त्यांनी २ मार्चपासून दवाखान्याबाहेर वृद्धाश्रमासारख्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेल्या ३८११ मृतांचा समावेश केला. त्यामुळे बळींची संख्या थेट २६ हजारावर पोहोचली. आता इंग्लंडमध्ये अमेरिका आणि इटलीखालोखाल बळी गेले आहेत. फ्रान्सने काल दिवसभरात ४२७ लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत २४ हजार ८७ बळी, एकूण रुग्ण १ लाख ६६ हजारावर आहेत. जर्मनीत काल १५३ बळी गेले, एकूण बळींची संख्या ६,४६७ इतकी झालीय. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल ८० ची भर, एकूण ५,९५७ मृत्यू, रुग्णांची संख्या ९३ हजार ६०० इतकी आहे. कोरोनाने बेल्जियममध्ये काल १७० मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा ७,५०१ इतका आहे. हॉलंडमध्ये काल १४५ बळी घेतले तिथे एकूण ४,७११ लोक दगावले आहेत. टर्की ३०८१, ब्राझील ५५११, स्वित्झर्लंडने १,७१६, स्वीडनमध्ये २४६२, पोर्तुगाल ९७३, कॅनडात २९९६, इंडोनेशिया ७८४,इस्रायल २१५ तर सौदी अरेबियात १५७ बळी कोरोनामुळे गेले आहेत. दक्षिण कोरियात काल १ मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा २३८ इतका आहे. आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या १५ हजार ५२५ वर पोहोचली आहे, तिथे ३४३ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. गेल्या २४ तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये ८१,६७८ तर बळींच्या आकड्यात ६,५९३ ची भर पडली आहे.