वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सातव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 216,919 रुग्ण आहेत. तर 6,088 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 106,724 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 104,107 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,901,783 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 109,142 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 39,728 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 279,856 इतकी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 583,980 कोरोनाबाधित आहेत तर 32,547 लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,128 लोकांचा मृत्यू झालाय. 287,406 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 33,601 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 233,836 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,901,783, मृत्यू - 109,142
- ब्राझील: कोरोनाबाधित- 583,980, मृत्यू - 32,547
- रशिया: कोरोनाबाधित- 432,277, मृत्यू - 5,215
- स्पेन: कोरोनाबाधित- 287,406, मृत्यू - 27,128
- यूके: कोरोनाबाधित- 279,856, मृत्यू - 39,728
- इटली: कोरोनाबाधित- 233,836, मृत्यू - 33,601
- भारत: कोरोनाबाधित- 216,824, मृत्यू - 6,088
- जर्मनी: कोरोनाबाधित- 184,425, मृत्यू - 8,699
- पेरू: कोरोनाबाधित- 178,914, मृत्यू - 4,894
- टर्की: कोरोनाबाधित- 166,422, मृत्यू - 4,609
7 देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत हे सात देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. इटली, ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 30 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.