वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात अकराव्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 118,226 रुग्ण आहेत. तर 3,584 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 66,089 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 48,553 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 1,620,457 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 96,295 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 36,042 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 250,908 इतकी आहे. स्पेनमध्ये कोविड-19मुळं 27,940 लोकांचा मृत्यू झालाय. 280,117 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,486 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 228,006 इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 1,620,457, मृत्यू- 96,295
- रशिया: कोरोनाबाधित- 317,554, मृत्यू- 3,099
- ब्राझील: कोरोनाबाधित- 310,087, मृत्यू- 20,047
- स्पेन: कोरोनाबाधित- 280,117, मृत्यू- 27,940
- यूके: कोरोनाबाधित- 250,908, मृत्यू- 36,042
- इटली: कोरोनाबाधित- 228,006, मृत्यू- 32,486
- फ्रांस: कोरोनाबाधित- 181,826, मृत्यू- 28,215
- जर्मनी: कोरोनाबाधित- 179,021, मृत्यू- 8,309
- टर्की: कोरोनाबाधित- 153,548, मृत्यू- 4,249
- इरान: कोरोनाबाधित- 129,341, मृत्यू- 7,249
12 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 96 हजारांवर गेला आहे.