जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात बाराव्या स्थानावर. भारतात आत्ता कोविडचे 74 हजार 292 रुग्ण आहेत. तर भारतात कोरोनामुळं 2415 बळी गेले आहेत.
Coronavirus | कोरोनाचा खात्मा होण्यासाठी अजून खूप वेळ, संसर्ग वाढणं चिंतेची बाब : WHO
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेने गेल्या 24 तासात 1630 लोक गमावले आहेत. तर एकूण बळी 83 हजार 425 वर पोहोचली आहे. रुग्णांची संख्या 14 लाख 8 हजारांवर गेली आहे.न्यूयॉर्क प्रांतात काल 172 बळी गेले. तिथे एकूण मृतांचा आकडा 27 हजार 175 तर रुग्णांची संख्या 3 लाख 48 हजारांवर गेली आहे.
त्या खालोखाल न्यूजर्सीत 9541, मासाचुसेट्स 5141, मिशिगन मध्ये 4674, पेनसिल्वानिया 3918, इलिनॉईस 3601, कनेक्टिकट 3041, कॅलिफोर्निया 2876, लुझियाना 2347, फ्लोरिडा 1782, मेरीलँड 1756, जॉर्जिया 1494, टेक्सास 1179 आणि वॉशिंग्टनमध्ये 964 लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.
स्पेनने गेल्या चोवीस तासात 176 लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 26 हजार 920 वर पोहोचला आहे.
गेल्या चोवीस तासात इटलीत कोविड-19 रोगाने 172 माणसांचा बळी घेतला. आता इटलीतील एकूण बळींची संख्या 30 हजार 911 वर पोहोचली आहे. काल रुग्णांची संख्या 1402 ने वाढली, इटलीत आता जवळपास 2 लाख 21 हजारावर रुग्ण आहेत.
इंग्लंडने गेल्या 24 तासात 627 माणसं गमावली, एकूण बळींची संख्या 32 हजार 692 वर पोहोचली आहे. फ्रान्सने काल दिवसभरात 348 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 26 हजार 991 बळी गेले आहेत. तर एकूण रुग्णसंख्या 1 लाख 78 हजारांवर पोहोचली आहे.
रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत रशिया आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे 2 लाख 32 हजारावर रुग्ण असून काल 107 बळी गेले, एकूण 2116 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमध्ये काल बळींच्या संख्येत काल 48 ची भर पडली. एकूण 6733 मृत्यू झाले असून रुग्णांची संख्या 1 लाख 10 हजारांवर गेली आहे.
कोरोनाने बेल्जियममध्ये काल 54 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 8761 इतका आहे. हॉलंडमध्ये काल 54 बळी घेतले तिथे एकूण 5510 लोक दगावले आहेत. ब्राझिलमध्ये 12404, कॅनडात 5169, टर्की 3894, स्वीडनमध्ये 3313, स्वित्झर्लंडने 1867, पोर्तुगाल 1163, इंडोनेशिया 1007, इस्रायल 260तर सौदी अरेबियात 264 बळी कोरोनामुळं गेले आहेत.
दक्षिण कोरियात गेल्या पाच दिवसानंतर काल पहिल्यांदा मृत्यूची नोंद झाली, काल 2 बळी गेले, तिथे रुग्णांची संख्या 27 ने वाढली एकूण रुग्ण 10 हजार 936 तर मृतांचा आकडा 258 वर गेला आहे. पाकिस्तानात रुग्णांची संख्या 32 हजार 674 च्या वर पोहोचली आहे, तिथे काल 57 बळी गेले, एकूण मृतांचा आकडा 724 वर गेला आहे.
गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 85 हजार 335 तर बळींच्या आकड्यात 5 हजार 320 ची भर पडली आहे.
10 देशांमध्ये प्रत्येकी एक लाखांहून अधिक कोरोनाबाधित
जर्मनी, रशिया, ब्राझिलसह दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन या पाच देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा 83 हजारांवर गेला आहे.
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौदाव्या स्थानावर भारतात आत्ता कोविडचे 67 हजार 161 रुग्ण तर 2212 बळी कोरोनामुळं गेले आहेत.