नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून जगभरातील इतर देशांमध्ये पसरलेला जीवघेणा कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोना बाधित आहेत. जगभरात आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 74 हजार 697 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना बाधित अमेरिकेत आहेत. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 10 हजार 871 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये आता संसर्ग झालेल्या रूग्णांच्या संख्येत घट आल्याचं पाहायला मिळत आहे. जाणून घ्या जगभरातील अपडेट्स...


अमेरिकेत वाढू शकते मृतांची संख्या


अमेरिकेच्या सर्जन जनरलनी कोरोनाच्या महामारीला दुसऱ्या महायुद्धात झालेल्या पर्ल हार्बरच्या हल्ल्याप्रमाणे सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, या आठवड्यात अमेरिकेतमध्ये कोरोनामुळे मृतांची संख्या वाढू शकते. अशातच देशात दुसऱ्या पर्ल हार्बर हल्ल्यासाठी तयार राहा, अमेरिकेनंतर स्पेन, इटली आणि जर्मनीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहे. देशामध्ये कोविड-19 चा संसर्ग झालेल्यांची संख्या 3 लाख 67 हजार झाली आहे. त्यामध्ये 10871 लोकांचा मृत्यू झाला आहे.


पाहा व्हिडीओ : जगभरात साडे 13 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त; अमेरिका, स्पेन, इटलीत कोरोनाचा कहर



इटलीमध्ये मृतांच्या आकड्यात घट


इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे सोमवारी 636 लोकांचा मृत्यू झाला आहे. 27 मार्च रोजी देशामध्ये एका दिवसात सर्वाधिक 969 लोकांचा मृत्यू झाला आहे. तेव्हापासून नऊ दिवसांपैकी पाच दिवसांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशामध्ये कोरोना व्हायरस महामारीमुळे पहिला मृत्यू 20 फेब्रुवारी रोजी झाला होता. दरम्यान, अद्यापही देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहायला मिळत आहे. इतर देशांच्या तुलनेत इटलीमध्ये मृतांचा आकडा 16,523 वर पोहोचला आहे. देशामध्ये महामारीमुळे संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 1 लाख 32 हजार 547 वर पोहोचली आहे.


स्पेनमध्ये 13341 लोकांचा मृत्यू


स्पेनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळ एकूण 136,676 मृत्यू झाले आहेत. त्यातील 13,341 लोकांचा मृत्यू झाला आहे.


ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा 5000 पार


ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांपैकी आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकड्यांनुसार, या आजारामुळे 439 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने एक ट्वीटमध्ये सांगितलं की, 'पाच एप्रिल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर उपचारासाठी दाखल केलेल्या रूग्णांपैकी 5,373 लोकांचा मृत्यू झाला आहे.'


पाहा व्हिडीओ : भिवंडीतील संस्थेकडून पांचोली दाम्पत्य वर्षभर दत्तक, 'माझा'च्या बातमीनंतर मदतीचा ओघ



कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे बोरिस जॉनसन आयसीयूमध्ये दाखल


कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जॉनसन (55) यांना लंडन येथील सेंट थॉमस हॉस्पिटलमद्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर ब्रिटेनचे विदेश मंत्री डोमिनिक राब यांनी ब्रिटनचा कार्यभार सांभाळला आहे.


फ्रान्समध्ये 9000 लोकांचा मृत्यू


फ्रान्सने सोमवारी सांगितले की, मागील 24 तासांमध्ये रूग्णालयात कोरोनामुळे 833 नव्या रूग्णाचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 8,911 वर पोहोचली आहे.


जर्मनीमध्ये 90 हजारांहून अधिक रूग्ण


जर्मनीमध्ये Covid-19चा संसर्ग झालेल्यांची संख्या 91,714 वर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 1342 लोकांचा मृत्यू झाला आहे.


संबंधित बातम्या : 


Lock Down | फिलिपिन्समध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणारा गोळ्या घालून ठार!


अमेरिकेकडून हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी, भारत पुरवणार औषध