वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 426,910 रुग्ण आहेत. तर 13,703 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 175,955 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 237,252 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 2,356,655 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 122,247 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 1,086,990 कोरोनाबाधित आहेत तर 50,659 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 42,632 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 304,331 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,634 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 238,499 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
अमेरिका: कोरोनाबाधित - 2,356,655 मृत्यू- 122,247
ब्राझिल: कोरोनाबाधित - 1,086,990 मृत्यू- 50,659
रशिया: कोरोनाबाधित - 584,680 मृत्यू- 8,111
भारत: कोरोनाबाधित - 426,910 मृत्यू- 13,703
यूके: कोरोनाबाधित - 304,331 मृत्यू- 42,632
स्पेन: कोरोनाबाधित - 293,352 मृत्यू- 28,323
पेरू: कोरोनाबाधित - 254,936 मृत्यू- 8,045
चिली: कोरोनाबाधित - 242,355 मृत्यू- 4,479
इटली: कोरोनाबाधित - 238,499 मृत्यू- 34,634
इराण: कोरोनाबाधित - 204,952 मृत्यू- 9,623
दहा देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण हे दहा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.