वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 4,11,727 रुग्ण आहेत. तर 13,277 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 170,269 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 228,181 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 23,30,578 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 1,21,980लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 10,70,139 कोरोनाबाधित आहेत तर 50,058 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर यूकेत 42,589 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 3,03,110 इतकी आहे. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली चौथ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 34,610 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,38,275 हजार इतका आहे.
कोणत्या देशात किती कोरोनाबाधित
- अमेरिका: कोरोनाबाधित- 23,30,578 मृत्यू- 1,21,980
- ब्राझिल: कोरोनाबाधित- 10,70,139 मृत्यू- 50,058
- रशिया: कोरोनाबाधित- 5,76,952 मृत्यू- 8,002
- भारत: कोरोनाबाधित- 4,11,727 मृत्यू- 13,277
- यूके: कोरोनाबाधित- 3,03,110 मृत्यू- 42,589
- स्पेन: कोरोनाबाधित- 2,93,018 मृत्यू- 28,322
- पेरू: कोरोनाबाधित- 2,51,338 मृत्यू- 7,861
- इटली: कोरोनाबाधित- 2,38,275 मृत्यू- 34,610
8 देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु हे आठ देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखाहून अधिक बळी गेले आहेत. ब्रिटन, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.