जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमुख टेड्रोस गेब्रेसियोस यांनी सांगितले की, चीनच्या तुलनेत युरोपीयन देशांमध्ये हा आजार वेगाने पसरत आहे. एकट्या इटलीमध्ये मृतांचा आकडा 1266 झाला आहे. तर 17660 लोकांना या विषाणूचे संक्रमण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देश आता खबरदारीचा उपाय अवलंबताना दिसत आहे. युक्रेनने परदेशी नागरिकांना आपली सीमा बंद केली. येथे तीन जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव ऑफ्रिकन खंडातील सुमारे 18 देशांमध्ये झाला आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी देशात 15 दिवसांची आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलीय.
Coronavirus | मुंबईत चौथा कोरोनाबाधित, अहमदनगरमध्येही एकाला लागण, राज्यात एकूण 19 रुग्ण
भारतातही पर्यटक व्हिसा रद्द
भारत सरकारने 15 एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हिसा रद्द केले आहेत. याचा अर्थ भारतात कोणीही परदेशी पर्यटक दाखल होऊ शकणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आलाय. यात फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना भारताचा व्हिसा 15 एप्रिलपर्यंत मिळणार नाहीय. भारतात करोना विषाणूचं वाढत जाणारं संक्रमण पाहाता केंद्र सरकारनं फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनच्या नागरिकांना तात्पुरती बंदी घातली आहे. नियमित व्हिसासह ई व्हिसावरही आता बंदी असणार आहे.
देशात कोरोनाचा दुसरा बळी दिल्लीत
देशात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. दिल्लीतील 68 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही आज कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. अहमदनगरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण झाली आहे, तर मुंबईतही आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालंय. मुंबईत आता 4, पुण्यात 10, नागपुरात 3 तर ठाण्यात एकाला कोरोनाची लागण झाली आहे. आता राज्यात एकूण 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
Coronavirus | कोरोना विषयी तुमच्या आमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं