सिंगापूर : जगभरात कोरोनाचा कहर सुरु आहे. रोज हजारो लोक या महामारीचे शिकार बनत आहेत. या महामारीच्या तडाख्यातून सिंगापूर देखील सुटलेलं नाही. मात्र सिंगापूरमध्ये या कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढण्याच्या आधी नियंत्रणासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. रांगेत किंवा सार्वजनिक ठिकाणी दुसऱ्याच्या तीन फूट जवळ जाल तर थेट जेलमध्ये टाकण्याचा इशारा दिला आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठीच्या लढ्यात सिंगापूरमध्ये हा नवा कडक नियम लागू करण्यात आला आहे.
मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा तिकीटाच्या रांगेत तुम्हाला हे सुरक्षित अंतर राखणं गरजेचं आहे. जाणूनबजून या या नियमाचं पालन केलं नाही, मुद्दाम दुसऱ्याच्या जवळ गेलात तर 5 लाख रुपयांचा दंड किंवा सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा भोगावी लागू शकते.
अर्थात आपण आपल्या कुटुंबासोबत असलो तरी ही शिक्षा लागू असेल का किंवा गर्दीच्या वेळी ट्रेन, बसमध्ये हा नियम कसा पाळणार अशा अनेक शंका, प्रश्न लोकांच्या मनात आहेतच.
सिंगापूरमध्ये सर्व व्यवहार सुरळीत आहेत, लॉकडाऊन नाही मात्र येत्या काही काळात योग्य ते उपाय योजले जातील असे संकेत सरकारने दिले आहेत. तिथे सिनेमा हॉल, बार बंद आहेत तसंच मोठ्या इव्हेन्ट्सवर बंदी आहे.
आत्ताच्या घडीला सिंगापूरमध्ये कोरोनाचे 732 रुग्ण आहेत तर 2 लोकांनी जीव गमावला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत 73 ची भर पडली होती त्यात ३ वर्षांच्या भारतीय मुलीचा समावेश होता
लोकांनी सोशल डिस्टन्सिंगला गंभीरपणे घेतलं नाही तर आगामी काळात अत्यंत कडक नियम आणि ते न पाळणारांना जास्त कडक शिक्षेचा विचार तिथलं सरकार करत आहे.
सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी तीन फुटाची जवळीक कराल तर थेट जेलमध्ये, 'या' देशाचा नवा कडक नियम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Mar 2020 08:20 AM (IST)
सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी तीन फुटाची जवळीक कराल तर थेट जेलमध्ये टाकले जाणार आहे.
कोरोना व्हायरसला अटकाव घालण्यासाठी सिंगापूरमध्ये हा नवा कडक नियम लागू करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -