मुंबई : जगभरातील तरणाईवर त्यांच्या लहानपणी अधिराज्य गाजवलेलं सर्वात लोकप्रिय कार्टून ‘बॉब द बिल्डर’ सर्वांनी पाहिलं असेल. मात्र या कार्टूनच्या प्रेमात पडेलल्यांसाठी एक दु:खद बातमी आहे. ‘बॉब द बिल्डर’ या कार्टूनचा खऱ्या अर्थाने आवाज ठरलेले विलियम डफ्रिस यांचं निधन झालं आहे.

गेल्या कित्येक दिवसापासून विलियम डफ्रिस कर्करोगाने त्रस्त होते. अखेर त्यांचं वयाच्या 62 व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झालं. त्यांच्या पॉकेट युनिव्हर्स प्रोडक्शन कंपनीत काम करत असलेल्या त्यांच्या साथीदारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डफ्रिस यांच्या निधनाची माहिती दिली. त्यांना ट्विट करत, “आम्हाला सांगताना दु:ख होतं आहे की पॉकेट युनिव्हर्स प्रोडक्शनचे सह-संस्थापक आणि इसी कॉमिक्स द्वारे प्रकाशित होणारा ‘द वोल्ट ऑफ हॉरर’ शोचे दिग्दर्शक विलियम डफ्रिस यांचं निधन झालं आहे.”

विलियम डफ्रिस यांचा प्रवास

  • लंडन रेडिओमध्ये करियरची सुरुवात

  • ऑडिओ ड्रामामध्ये 'स्पायडर मॅन' मधील पीटर स्पार्करची भूमिका

  • ‘बॉब द बिल्डर’च्या नऊ सिजनना आवाज दिला

  • आत्तापर्यंत एकूण ‘बॉब द बिल्डर’च्या 75 भागांना आवाज


दरम्यान ‘बॉब द बिल्डर’ची सुरुवात 1998 साली झाली होती. ‘बॉब द बिल्डर..करके दिखाएंगे..हा भाई हा..’ हे शब्द ऐकल्यानंतर प्रत्येक जण टिव्ही बघायचे. आता हा आवाज आपल्या कोणालाही ऐकता येणार नाही.