Coronavirus : ब्रिटिश शास्त्रज्ञांनी 5 मिनिटा रिपोर्ट देणारी रॅपिड कोरोना व्हायरस टेस्ट विकसित केली आहे. या डिवाइसचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या रॅपि़ड अँटिजन टेस्टपेक्षा ही तीनपट वेगवान आहे. ऑक्सफोर्डच्या टीमला आशा आहे की पुढील वर्षाच्या सुरूवातीला डिवाइसची तयारी सुरु करण्यात येईल. तर त्यानंतर मंजूर केलेले डिवाइस सहा महिन्यांनंतर उपलब्ध होईल.


कोरोना व्हायरसचा रिपोर्ट 5 मिनिटात मिळणार?


ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रोफेसर अखिलस कापानडिज यांनी सांगितलं की, "आमची पद्धत कोरोना व्हायरसचा अंश तात्काळ पकडण्याचा आहे. इतर तंत्रांमध्ये अँटी बॉडी रिस्पॉन्सचा उशीरा शोध लागतो. हे महाग आणि कंटाळवाणे असून सँपल घेण्यासही बराच वेळ लागतो. याचा अर्थ असा की हे टेस्ट किट सोपं, वेगवान आणि कमी किमतीचं असणार आहे.


संशोधकांनी जारी केलेल्या केलेल्या प्री-प्रिंट रिसर्चच्या परिणामात असा दावा आहे की, या डिवाइसमध्ये इतर व्हायरसमध्येही कोरोना व्हायरस शोधण्याची क्षमता आहे. नॅजल स्वॅबच्या मदतीने किट कोरोना व्हायरसच्या पृष्ठभागावर असलेले प्रोटिन किंवा अँटी बॉडी स्कॅन करु शकते. अँटिजन टेस्ट PCR विश्वासार्ह नसतात, की जे कोरोना व्हायरसचे अत्यंत सूक्ष्म कण कॅप्चर करू शकतील. परंतु समर्थकांचा असा दावा आहे की रॅपिड टेस्ट परिवर्तनकारक असेल कारण ती विमानतळ आणि कार्यालयात नेली जाऊ शकते आणि इतरांना संसर्ग होण्याचा धोका पटकन ओळखता येईल.


कोरोनाची जगभरातील सद्यस्थिती


गेल्या 24 तासांत जगभरात पहिल्यांदाच सर्वाधिक 4.12 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच याआधी एकदिवस अगोदर 3.97 लाख नवे कोरोना बाधित आढळून आले होते. या व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांत 6185 लोकांचा मृत्यू झाला आहे.


वर्ल्डोमीटरनुसार, जगभरात आतापर्यंत 3 कोटी 95 लाख 65 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 11 लाख 8 हजार 617 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2 कोटी 96 लाख 48 हजार रुग्ण बरे झाले आहेत. संपूर्ण जगभरात केवळ 88 लाखांहून अधिक अॅक्टिव्ह केस आहेत.




  1. अमेरिका : एकूण रुग्ण 8,288,278, मृत्यू 223,644

  2. भारत : एकूण रुग्ण 7,430,635, मृत्यू 113,032

  3. ब्राजील : एकूण रुग्ण 5,201,570, मृत्यू 153,229

  4. रशिया : एकूण रुग्ण 1,369,313, मृत्यू 23,723

  5. स्पेन : एकूण रुग्ण 982,723, मृत्यू 33,775

  6. अर्जेंटीना : एकूण रुग्ण 965,609, मृत्यू 25,723

  7. कोलंबिया : एकूण रुग्ण 945,354, मृत्यू 28,616

  8. पेरू : एकूण रुग्ण 862,417, मृत्यू 33,648

  9. मेक्सिको : एकूण रुग्ण 834,910, मृत्यू 85,285

  10. फ्रान्स : एकूण रुग्ण 834,770, मृत्यू 33,303