China Covid-19 : जगभरात पुन्हा एकदा कोरोना महामारीने डोकं वार काढलेय. मागील महिनाभरात जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोना महामारीचे केंद्रबिंदू असणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा चिंताजनक स्थिती असल्याचे समोर आलेय. चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. इतकेच नाही तर चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या मृताचे प्रमाणही वाढलेय. त्यामुळे चीनमधील स्मशानं (शवदाह केंद्र) 24 तास सुरु आहेत. चीनमध्येही कोरोनाच्या जेएन1 या कोरोनाच्या सबव्हेरियंटने कहर केलाय. दरम्यान, दिवसेंदिवस भारतातही जेएन1 व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये वाढ होतेय. नागरिकांनी घाबरुन न जाता, खबरदारी घ्यावी, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलेय. 


डेली स्टारच्या रिपोर्ट्नुसार, कोरोनाच्या जेएन1 या सब व्हेरियंटमुळे चीनमध्ये मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्मशानात पुन्हा एकदा गर्दी होतेय, 24 तास स्मशानं सुरु आहेत. कोरोनाचा नवा व्हेरियंट जगभरात वेगानं पसरतोय.  जागतिक आरोग्य संघटनेने या सबव्हेरियंटला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकरण केले आहे. WHO नं म्हटलेय की, गेल्या काही दिवसांत अनेक देशांमध्ये JN.1 च्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.  जगभर त्याचा वेगाने प्रसार होत आहे.


स्मशानात गर्दी वाढली


डेली स्टार वृत्तपत्राने चीनमधील हेनान प्रांतातील स्थानिक लोकांच्या आधारे रिपोर्ट तयार केलाय. त्या रिपोर्ट्सनुसार, कोरोनामुळे येथील स्थिती अतिशय बिकट झाली आहे. सरकारी स्मशानात इतके मृतदेह येत आहेत की गर्दी वाढली आहे. स्मशानात 24 तास मृतदेह जाळले जात आहेत. एवढेच नाही तर जाळण्याच्या प्रतीक्षेत असलेले मृतदेह फ्रीझरमध्ये ठेवले जात आहेत. अशा परिस्थितीत लोकांना अंत्यसंस्कारासाठी तासंतास वाट पाहावी लागतेय.


भारतात कोरोनाची स्थिती काय ? 


देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 628 नवे रुग्ण आढळून आलेत. त्याचप्रमाणे आतापर्यंत देशात 4 कोटी 44 लाख 71 हजार 860 लोकं बरे होऊन घरी परतलेत. सध्या देशात बरे होण्याचा दर हा 38.81 टक्के इतका असून मृत्यू दर हा 1.19 टक्के इतका आहे. 


महाराष्ट्रात आज जेएन 1 चे 10 रुग्ण आढळले - 


महाराष्ट्रात कोरोनाचे (Corona) रुग्णात वाढ होतेय.  JN1 या व्हेरियंटमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. सोमवार 25 डिसेंबर रोजी राज्यात 28 नव्या रुग्णांचं निदान झालं. तसेच आतापर्यंत राज्यात JN1 व्हेरियंटचे 10 सक्रिय रुग्ण आढळून आलेत.  हिवाळा आला आणि पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं. एकीकडे रुग्णसंख्या वाढत जरी असली तरी कोरोनामुळे होणारे मृत्यू खूप कमी आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत जरी असली तरी झालेलं मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा फायदा देखील होताना दिसतोय. मात्र, जेष्ठ नागरिक असतील किंवा इतर व्याधी असलेल्यांना सतर्क राहण्याची गरज आहे.