Congo Boat Capsized Accident: काँगोमध्ये एक नाव उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 25 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये फुटबॉल खेळाडूंचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. एपी प्रेसच्या वृत्तानुसार प्रांतीय प्रवक्ते एलेक्सिस मपुतु यांनी सांगितलं की खेळाडू रविवारी रात्री माई-न्डोम्बे प्रांतातील मुशी शहरातून एक मॅच खेळून झाल्यानंतर परत येत होते. त्यावेळी त्यांची नाव क्वा नदीत उलटली.  

मुशीचे स्थानिक अधिकारी रेनेकल क्वातिबा यांच्या अनुसार, नाव दुर्घटनेतून 30 लोकांना वाचवण्यात आलं आहे. काही लोक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती असून त्यांचं शोध आणि बचावक कार्य सुरु आहे.काँगोत या प्रकारच्या दुर्घटना सर्वसाधारण गोष्ट मानली जाते. यापूर्वी अनेकदा नाव दुर्घटना घडल्या आहेत. जेव्हा लोक रात्रीच्यावेळी मोठ्या संख्येनं प्रवाशांना घेऊन प्रवास केला जातो, तेव्हा अशा दुर्घटना घडल्याचे प्रकार झाले आहेत. 

नाव दुर्घटनांची कारणं

काँगोमध्ये नद्या स्थानिक लोकांसाठी प्रवासाचं एक महत्त्वाचं साधन आहे. जिथं रस्ते आणि इतर वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी जलमार्गांचा वापर केला जातो. काँगोमधील 10 कोटी लोकसंख्या नद्यांमधील जलमार्गांवर अवलंबून असते. मात्र, सुरक्षेची उपकरणं कमी असल्यानं जहाजांची मोठी गर्दी असल्यानं अशा प्रकारच्या दुर्घटना होत असतात. दुर्घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात मृतांची संख्या समोर येणं यामध्ये लाईफ जॅकेट कमी असणं, अधिक गर्दी असणं आणि निष्काळजीपणा देखील कारणीभूत असतो. वेगवान वादळं आणि प्राकृतिक संकटांच्या काळात ही स्थिती गंभीर होते. यामुळं नाव पलटण्याचा धोका वाढतो.  

जहाचांजी सुरक्षा गंभीर मुद्दा 

काँगोमध्ये घडलेल्या 25 जणांच्या या मृत्यू प्रकरणानंतर जहाज किंवा नाव सुरक्षा हा प्रश्न गंभीर झाला आहे. या गंभीर समस्या सोडवणं आवश्यक बनलं आहे. नाव दुर्घटनेमुळं जे लोक प्रवासासाठी जलमार्गाचा वापर करतात, नद्यांवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी सतर्कता बाळगणं गरजेचं झालेलं आहे. या दुर्गटनेमुळं सुरक्षेच्या उपाययोजना आवश्यक असल्याचं दिसून येतं.  

इतर बातम्या : 

Donald Trump : तुमचा वीज पुरवठा बंद करु, ट्रम्प यांना त्यांच्या स्टाईलनं इशारा, कॅनडाच्या एका राज्याची धमकी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारी - मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली