कोलंबियाचे अध्यक्ष ह्युआन मॅन्युअल सांतोस यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. कोलंबियात 50 वर्षांपासून सुरु असलेलं गृहयुद्ध थांबवण्यात मोलाची भूमिका बजावल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
यंदा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी 376 जणांना नामांकन मिळालं होतं. यामध्ये 228 या व्यक्ती होत्या तर 148 संस्थांचा समावेश होता.
यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पोप फ्रान्सिस आणि सीरियात काम करत असलेल्या व्हाईट हेल्मेट संस्थेला फेव्हरीट मानलं जात होतं. मात्र कोलंबियाचे अध्यक्ष हुआन मॅन्युल सॅन्टोस यांना शांततेच्या नोबेलने गौरवण्यात आलं.
10 डिसेंबरला ओस्लो इथं हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.