तेहरान/इराण : इराण-इराकचा डोंगराळ सीमा भाग 7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला असून, आत्तापर्यंत या भूकंपाने तब्बल 135 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भूकंपामुळे रस्त्यावर आलेले अनेकजण जखमी झाले आहेत. भूकंपानंतर भूस्खलन मोठ्या प्रमाणात झाल्याने, मदत कार्यात अडथळे येत आहेत.
इरानच्या ‘आयआरआयबी’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपामुळे 129 जणांचा मृत्यू झाला. तर अधिकृत वृत्तसंस्था ‘इरना’च्या मते, या भूकंपात 300 जण जखमी झाले आहेत. तर इराकच्या सीमाभागात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू हलबजापासून 30 किमी नैऋत दिशेकडे होता. या भूकंपाचे धक्के केवळ इराण आणि इराकच्या सीमा भागातच नव्हे, तर इस्रायल आणि कुवेतमध्येही जाणवले.
भूकंपामुळे अनेक घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून, भूस्खलनामुळे वाहतूक आमि दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे.
या भूकंपानंतर इराणच्या करमानशाह प्रांताचे उप राज्यपाल मोजतबा निक्केरदर यांनी सांगितलं की, “भूकंपानंतर आम्ही तीन आपत्कालिन मदत शिबिर सुरु केले आहेत.”
इराण-इराकचा सीमाभाग भूकंपाने हादरला, 135 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Nov 2017 11:25 AM (IST)
इराण-इराकचा डोंगराळ सीमा भाग 7.3 रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरला असून, आत्तापर्यंत या भूकंपाने तब्बल 135 जणांचा मृत्यू झाला आहे.
फोटो सौजन्य : ILNA वृत्त संस्था
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -