India China Tussle: अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या एलएसीवर चिनी सैनिकांनी ओलीस ठेवल्याच्या बातमीनंतर चीनच्या सरकारी पत्रकारांनी गलवान घाटी हिंसाचारात भारतीय सैनिकांना ओलीस ठेवलेली छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. या फोटोंमध्ये जखमी भारतीय सैनिक आणि त्यांची शस्त्रे चिनी सैन्याच्या ताब्यात दिसत आहेत.


गेल्या आठवड्यात अरुणाचल प्रदेशच्या यांगत्सेमध्ये सुमारे 200 चीनी सैनिकांनी एलएसीचे उल्लंघन केले. या दरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यात अस्थिर परिस्थिती होती. यासंदर्भात काल म्हणजे शुक्रवारी असे वृत्त आले होते की, अशा परिस्थितीत भारतीय सैन्याने चिनी सैनिकांना ओलिस ठेवले होते. मात्र, दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्सच्या फ्लॅग मीटिंगनंतरच त्यांना सोडले होते. या घटनेने प्रेरित होऊन काही चिनी सरकारी पत्रकारांनी गॅलवान घाटीतील हिंसा सुमारे 16 महिन्यांनंतर सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध करून हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, की त्या युद्धात चीनच्या पीएलए सैन्याने भारतीय सैनिकांना ओलीस ठेवले होते.


गलवान घाटीच्या हिंसाचारात दोन्ही देशांच्या सैन्याने एकमेकांच्या सैनिकांना ओलीस ठेवले. नंतर, लष्करी कमांडर्सच्या बैठकीनंतरच दोन्ही देशांनी एकमेकांच्या सैनिकांना सोडले होते.


दरम्यान, अशी बातमी आहे की, पूर्व लडाखला लागून असलेल्या एलएसीवरील तणाव संपवण्यासाठी रविवारी भारत आणि चीनच्या लष्करी कमांडर्स यांच्यात 13 व्या फेरीची बैठक होणार आहे. ही बैठक पीएलए सैन्याच्या मोल्दो चौकीत होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांना पूर्व लडाखच्या गरम पाण्याच्या झऱ्यापासून दूर राहण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. 12 फेऱ्यांच्या बैठकीदरम्यान, पूर्व लडाखला लागून असलेल्या वास्तविक नियंत्रण रेषेच्या (एलएसी) फिंगर एरिया, कैलाश हिल रेंज आणि गोगरा भागात डिसएन्गेजमेंट झाले आहे. परंतु, हॉट स्प्रिंग, डेमचोक आणि डेपसांग मैदानावर तणाव अजूनही चालू आहे.


शांततेच्या चर्चा करतानाच उत्तराखंडमध्ये चीनची घुसखोरी


एकीकडे सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करायची आणि दुसरीकडे भारताच्या भूभागात घुसखोरी करायची असा दुतोंडी कारभार चीन करू लागला आहे. लडाखमध्ये सैनिकांची जमवाजमव करीत असतानाच आता उत्तराखंडच्या बाराहोटीत चीनी सैनिकांनी घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पाठीत खंजीर खुपसणाऱ्या चीनवर आता भारतानं करडी नजर ठेवून जशास तसं प्रत्युत्तर द्यायचे ठरवले आहे.