बीजिंगः ट्रॅफिकच्या समस्येमुळे तुम्हाला रस्त्याने प्रवासाचा कंटाळा येत असेल. पण आता ही समस्या सुटणार आहे. कारण ट्रॅफिकवरुन चालणारी बस तयार होणार आहे.

 

चीनमध्ये 19 व्या आंतरराष्ट्रीय बीजिंग हाय-टेक एक्स्पोमध्ये 'एलिव्हेटेड बस' या संकल्पनेचं अनावरण करण्यात आलं. रस्त्यावर वाहतूकीची कोंडी असली तरी ही बस वाहनांच्या वरुन चालते. असा एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

 

अशी आहे एलिव्हेटेड बस

बीजिंग स्थित एका बसं निर्मीती करणाऱ्या कंपनीने ही संकल्पना मांडली आहे. या बसमुळे केवळ ट्रॅफिकमुक्तीच नव्हे तर प्रदुषण टाळणं देखील सोपं होणार आहे. एलिव्हेटेड बस रस्त्यांच्या दोन्ही बाजूंच्या रेषांवर चालते. त्यामुळे वाहनांच्या वरुन ही बस चालते.

 

या बसमध्ये एकाच वेळी 1200 पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. भुयारी मार्गाप्रमाणेच ही बस कार्य करते. विशेष म्हणजे एलिव्हेटेड बस तयार करण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्याच्या पाचपट कमी खर्च येतो. तसेच ही बस बांधण्यासाठी एका वर्षापेक्षा कमी कालावधी लागतो, असे एलिव्हेटेड बसच्या प्रकल्पाचे इंजीनिअर बाय झायमिंग यांनी सांगितले.

 

एलिव्हेटेड बसची संकल्पना यापूर्वी 2010 मध्येही एका एक्स्पोमध्ये मांडण्यात आली होती.

 

पाहा व्हिडीओः