आतापर्यंत या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुलाने मरणापूर्वी आईशी शेवटचा संवाद साधल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
... आणि ते त्याच्याशी शेवटचं बोलणं ठरलं
मिनाक्षी जस्टिस असं मुलाच्या आईचं नाव आहे. आपल्या 30 वर्षीय मुलाची वाट पाहत मिनाक्षी जस्टिस नाईट क्लब बाहेर उभ्या होत्या. मुलगा येत नसल्यामुळे त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आतमध्ये गोळीबार चालू आहे, त्यामुळे लवकरात लवकर पोलिसांची मदत देण्याचा प्रयत्न कर, असा मेसेज केला.
मुलाने मेसेजमध्ये सांगितलं की, क्लबमधील इतर लोकांसोबत लपण्यासाठी तो बाथरुममध्ये गेला आहे. पण त्यानंतर मिनाक्षी आणि त्यांच्या मुलाचं ते शेवटचं संभाषण ठरलं.
या हल्ल्यामध्ये 50 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 53 जण जखमी झाले आहेत. गोळाबार करणाऱ्या व्यक्तिची ओळख पटवण्यात आली असून उमर मतीन असं नाव आहे. या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.