Canada Emergency Powers: : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कॅनडामध्ये कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड लस अनिवार्य करण्याविरोधात हजारो ट्रक चालक रस्त्यावर (Canada Truck Driving Stick) उतरले असून त्यांनी देशभरात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन संपण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो (Justin Trudeau) यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. वृत्तसंस्था 'एएनआय'च्या (ANI) ट्विटनुसार, '' महामारीमुळे लादलेल्या कडक निर्बंध मागे घेण्यासाठी सुरू असलेले आंदोलन संपण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली.''
ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन पाहता कॅनडाचे पंतप्रधान त्रुडो म्हणाले की, ते हे आंदोलन संपवण्यासाठी देशात आणीबाणी लागू करत आहेत. याचा वापर कठीण काळात केला जातो. त्रुडो म्हणाले की, या आंदोलनाचा परिणाम देशातील अर्थव्यवस्था आणि जनतेच्या सुरक्षिततेवर होत आहे. आम्ही देशासाठी धोका ठरेल अशा कोणत्याही कृत्याला परवानगी देऊ शकत नाही.
पंतप्रधान त्रुडो यांनी राजीनामा द्यावा, आंदोलनकर्त्यांची मागणी
कोरोनाचे कडक निर्बंध मागे घेण्यासाठी ट्रक चालक कॅनडातील राजधानी ओटावासह देशाच्या विविध भागात निदर्शन करत आहेत. ओटावाच्या अनेक भागात आंदोलनक ट्रक चालकांमुळे कामकाज ठप्प झाले आहे. ओटावात 50 हजारांहून अधिक ट्रक चालकांचे निदर्शन सुरू असून आंदोलक ट्रक चालकांनी पंतप्रधान त्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अमेरीका - कॅनडा सीमेवरील ब्रिज आंदोलनकर्त्यांनी केला होता बंद
अमेरीका -कॅनडा सीमेवरील सर्वात व्यस्त पूल असलेल्या 'अॅम्बेसेडर ब्रिज'वरही आंदोलक जमले होते. मात्र जवळपास आठवडाभर बंद राहिल्यानंतर रविवारी उशिरा हा पूल पुन्हा उघडण्यात आला. याबाबत माहिती देताना या पुलाचे मालक असलेल्या डेट्रॉईट इंटरनॅशनल ब्रिज कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, "अॅम्बेसेडर ब्रिज आता पूर्णपणे उघडला गेला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा कॅनेडियन आणि अमेरिका अर्थव्यवस्थांमधील व्यावसायिक वस्तूंचा मुक्त प्रवाह होऊ शकेल.''
कॅनडात 50 वर्षात पहिल्यांदात आणीबाणी
पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांच्यानुसार, देशाच्या इतिहासात 50 वर्षात पहिल्यांदाच आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यामुळे महामारीमुळे लादलेल्या कडक निर्बंध मागे घेण्यासाठी सुरू असलेले आंदोलन संपवण्यासाठी मोठी मदत होऊ शकेल.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- China Uighur Muslim : शिनजियांगमध्ये मुस्लिमांवर दडपशाही, सक्तीची मजुरी; UN च्या रिपोर्टमधून समोर
- Ukraine : युक्रेन संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेसह अनेक मित्र देश एकत्र, व्हाईट हाऊसचा दावा
- Viral Video : विमानात साप दिसल्याने प्रवाशांमध्ये खळबळ, व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha