California Wildfire : कॅलिफोर्नियाच्या (California) जंगलामध्ये मोठं अग्नितांडव पाहायला मिळत आहे. जंगलात मोठा वणवा (Wildfire) पेटला असून पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियाच्या एका भागात आणीबाणी (State Of Emergency) लागू करण्यात आली आहे. अमेरिकेच्या  (US) जंगलात मोठा वणवा (Wildfire) पेटला आहे. ही अमेरिकेच्या जंगलातील सर्वात मोठा वणवा आहे. ही आग योसेमाइट नेशनल पार्क (Yosemite National Park) जवळ वेगाने पसरत आहे.


ओक येथे  (Oak Fire) शुक्रवारी लागलेली आग वेगाने पसरत आहे. अग्निशमन दलापुढे या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं कठीण आव्हान आहे, अग्निशमन दलाच्या (FireFighters) कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आग स्फोटक असल्यामुळे आगीची दाहकता वाढत असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांसमोर आव्हान निर्माण झालं आहे.


आगीमुळे हजारो लोकांचं स्थलांतर
या परिसरातील लोकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात आलं आहे. आगीत दहाहून अधिक घरं जळून खाक झाली आहे. या आग लागलेल्या परिसरातून सहा हजारहून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. आगीमुळे कॅलिफोर्नियामध्ये आणीबाणीची परिस्थिती आहे. मारिपोसा काउंटी (Mariposa County) येथे आणीबाणी लागू करण्यात आली आहे. 


पुढील आठवड्यापर्यंत आगीवर नियंत्रण नाही
कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या या आगीवर पुढील आठवड्यापर्यंतही नियंत्रण मिळण्याची शक्यता नसल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आग विझवण्यासाठी सुमारे 400 अग्निशामकांकडून (FireFighters) शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कॅलफायरच्या (CalFire) प्रवक्त्या नताशा फॉउट्स यांनी सांगितलं आहे की, पुढील आठवड्यातही आगीवर नियंत्रण मिळवण्याची शक्यता कमी आहे.


नागरिकांचं स्थलांतर आणि पुर्नवसन करण्यात अडथळे


आगीमुळे स्थानिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आगीतून सुरक्षित बाहेर काढलं जात आहे, पण या लोकांच्या राहण्याची सोय करताना प्रशासनाला अडथळा येत आहे. सुरक्षित ठिकाणी बहुतेक हॉटेल्स आधीच पूर्णपणे भरली आहेत. आता हॉटेलमध्ये रिकाम्या खोल्याही शिल्लक नाही.


वणव्यामुळे तापमान वाढलं


अमेरिकेच्या बहुकेत भागात उष्णतेची लाटेत पाहायला मिळत आहे.  अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मारिपोसा काउंटीमधील तापमान शनिवारी 96F (35.5C) पर्यंत पोहोचले आहे आणि पुढील काही दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.