दुबईच्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2017 06:28 PM (IST)
दुबई: भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दुबईच्या बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे. उद्याच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अबु धाबीचे युवराज शेख महम्मद बिन जाएद अल नहयान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानिमित्त दुबईमधील बुर्ज खलिफाला तिरंग्याची सजावट करण्यात आली आहे. दुबईमधील 2722 फुटी बुर्ज खलिफाला तिरंग्याने सजवण्यात आलं आहे. तिरंग्याने नटलेल्या बुर्ज खलिफाला पाहण्यासाठी पर्यटक आणि नागरिकांनीही मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, मंगळवारी युवराज शेख भारतात पोहचले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेख यांचे थेट विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात डझनहुन अधिक परस्पर सहकार्य करारावर उभयंतांमध्ये स्वाक्षऱ्या होणार असून, यामध्ये 75 अरब डॉलरच्या गुंतवणूकीचाही समावेश आहे. याशिवाय युवराज शेख उद्या राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबत स्नेह भोजनही करणार आहेत.