सामान्यत: पेनच्या निबची शाई वाळावी, यासाठी कॅपवर छिद्र असतं, असं समजलं जातं. तसं हे कारण पूर्णत: चुकीचंही नाही. पण कॅपला छिद्र असण्याचं हे खरं कारण हे नक्कीच नाही.
खरं कारण काय?
पेन कॅपला छिद्र असण्याचं मूळ कारण समजलं तर तुम्हीही याचा शोध लावणाऱ्याचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. पेन कॅपला छिद्र असंण ही एक जीनियस आयडिया असल्याचं म्हटलं जातं. बॉल पेनच्या निर्मात्यांपैकी एक असलेले बिक क्रिस्टल यांनी कॅपला छिद्र ठेवण्याचा निरणय घेतला.
अनेकांना विशेषत: लहान मुलांना पेन कॅप तोंडात घालण्याची सवय असते. जर कॅप चुकून तोंडात गेलं आणि अडकलं तर ते जीवावर बेतू शकतं. कॅपमध्ये छिद्र नसल्यास हवा पास होऊ शकणार नाही. यामुळे एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.
याच कारणामुळे पेनच्या निर्मात्यांनी कॅपमध्ये जाणीवपूर्वक छिद्र ठेवलं आहे. जेणेकरुन कोणीही चुकून जरी पेन कॅप गिळलं तर त्याच्या जीवाचा धोका काही प्रमाणात कमी होऊ शकतो. दरम्यान, पेनच्या खालच्या भागातही छिद्र असतं.